यवतमाळ: बसस्थानकात 10 महिन्यात 13 लाखांचा मुद्देमाल लंपास ; अर्ध्या तिकिटाची गर्दी अन् चोरट्यांना आयतीच संधी
एसटी बसचा प्रवास हा सर्वांसाठीच फायद्याचा आहे. त्यात महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत असल्याने बसस्थानकावर प्रचंड गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे संधी साधतात. पर्समधील दागिने, खिशातील रोख अलगद काढून घेतात. मागील दहा महिन्यांत तब्बल १३ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. एकाच वेळी बसमध्ये चढण्याची धडपड चालते. या गर्दीतच चोरट्यांची टोळी शिरून प्रवाशांच्या बॅगेतील पर्स, पर्समधील रोख, दागिने काढून घेतात. बसस्टैंड वर होणारी चोरी पोलिसांना रोखण्यासाठी मोठे आवहान यवतमाळ जिल्ह्यात ठरत आहे