धुळे: नवरात्र उत्सवानिमित्त देवपुरात पाच दिवसीय महिला सुरक्षा विशेष मोफत प्रशिक्षण शिबिर; पत्रकार भवनात पत्रकार परिषदेत माहिती
Dhule, Dhule | Sep 16, 2025 नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘संस्कृती सुरक्षा महासंगम’ या घोषवाक्याखाली धुळे शहरातील महिलांसाठी पाच दिवसीय मोफत सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दि. १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान देवपुरातील केशरानंद गार्डन येथे होणाऱ्या या शिबिरात महिलांना आत्मसुरक्षेबरोबरच गरबा व घुमरो नृत्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून नोंदणी सुरू आहे.