जालना: स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी पंजा शिवसेनेच्या दावनीला बांधला; जिल्हाध्यक्षासह शहराध्यक्षावर गंभीर आरोप
Jalna, Jalna | Jan 18, 2026 जालना महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनीच पक्षाला शिवसेनेच्या दावणीला बांधल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक व नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांनी केला आहे. रविवार दि. 18 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, रशीद पहेलवान, राजेंद्र देशमुख आणि अतिक खान यांच्यावर थेट आरोप करण्यात आले. पत्रकार परिषदेत हे आरोप करण्यात आलेत.