अकोट: ऑपरेशन प्रहार अंतर्गत ग्रामीण पोलिसांची मुंडगाव येथे गांजा विक्री करणाऱ्या इसमावर छापा कारवाई
Akot, Akola | Nov 30, 2025 ऑपरेशन प्रहार अंतर्गत आकोट ग्रामीण पोलिसांनी रविवारी मुंडगाव येथे गांजा विक्री करणाऱ्या इसमावर छापा कारवाई केली.यावेळी त्याच्या ताब्यातून 1594 ग्रॅम अंदाजे किंमत 37 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल कारवाई केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आरोपी नामे संतोष रमेशलाल जयस्वाल वय 53 वर्ष राहणार मुंडगाव याच्या जवळील पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये गांजाचे पान फुले व बियाणे असा मुद्देमाल जप्त केला आहे.