रोहा: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विविध ठिकाणी बूथला भेट देऊन मतदार बंधु-भगिनींशी संवाद साधला
Roha, Raigad | Dec 2, 2025 आज मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास रोहा–अष्टमी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विविध ठिकाणी बूथला भेट देऊन मतदार बंधु-भगिनींशी संवाद साधला. तसेच लोकशाहीच्या ह्या सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपला अमूल्य मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.