कंत्राटी कामगार पत्नीने केला आत्मदहनाचा प्रयत्न कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यापासून नाही पगार
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 8, 2025
आज दिनांक 8 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता महापालिकेतील कंत्राटी कामगारांना मागील तीन महिन्यांपासून पगार मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक विवंचनेमुळे या थकीत वेतनासाठी नारळीबाग येथील महाराणा एजन्सीच्या कार्यालयावर कामगारांनी धडक दिली. या वेळी एका कामगाराच्या पत्नीने बाटलीमधून पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंत्राटदार आणि इतर कामगारांनी समजूत काढल्याने पुढील अनर्थ टळला.