राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे सोयाबीन, कापूस तूर व अन्य इतर पिकांची आधारभूत किंमतीप्रमाणेच खरेदी झाली पाहिजे तेव्हाच शेतकरी भारतीय संविधानाच्या कलम 21 नूसार सन्मानाने जीवन जगू शकेल शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमतीप्रमाणेच भाव मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चाकूर, तसेच चाकूर तहसील चे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.