धुळे: देवभाने शिवारात कत्तलीसाठी होणारी गुरांची अवैध वाहतूक रोखली; दोघांवर गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 28, 2025 मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने गावाजवळ सोनगीर पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मोठी कारवाई करत कत्तलीसाठी होणारी गुरांची अवैध वाहतूक रोखली. ट्रकमधून १९ गोवंश जनावरे दाटीवाटीने क्रूरपणे बांधून तळोदा येथून मालेगावला नेली जात होती. याप्रकरणी ट्रकचालक कुरेशी आमीन शेख मुसा व क्लीनर राहुल वळवी यांना ताब्यात घेतले असून, फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.