वर्धा: निकृष्ट कामाचा फटका, वाघोलीतील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, दोषींवर कारवाईची मागणी.
Wardha, Wardha | Sep 16, 2025 वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा धर्मापूर शिवारात एक बंधारा बांधण्यात आला होता. जवळपास आठ महिन्यांपूर्वी नागपूर येथील एका कंत्राटदाराने या बंधाऱ्याचे बांधकाम केले होते. परंतु पहिल्याच पावसात हा बंधारा पूर्णपणे वाहून गेला आहे. या घटनेमुळे परिसरातील सुमारे ५० शेतकऱ्यांच्या शेतात लावलेलं उभं पीक पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेलं. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचं हजारो हेक्टरवरील पीक नष्ट झाले असल्याचे16 सप्टें रोजी दुपारी 3 वाजता प्रसिद्धीस दिले.