राहुरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठात वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन उत्साहात संपन्न*
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणात आज शुक्रवारी दुपारी वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे म्हणाले की इंग्रजांच्या राजवटीमध्ये देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत प्रत्येक जण इंग्रज राजवटीविरुद्ध प्रखर लढा देत होता असे सांगितले.