रामटेक येथील शहीद अक्षय भिलकर याच्या शहीद दिवसाला एक वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत गांधी चौक रामटेक येथे बुधवार दिनांक 12 नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता पासून ते दहा वाजता पर्यंत फ्रेंड्स फोरेवर ग्रुप रामटेक तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहीद अक्षय याच्या प्रतिमेवर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.