स्थानिक बस स्थानकावर एसटी बस चालकाच्या बेजबाबदार नियोजनामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बस क्रमांक MH 40 N 9240 च्या चालकाने बस थेट डिवाइडरला लागून उभी केल्याने प्रवाशांना, विशेषतः चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये चढताना मोठी कसरत करावी लागली. या गोंधळात आणि जागेअभावी सुमारे १२ ते १५ विद्यार्थी थेट डिवाइडरवर कोसळले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु चालकाच्या या वागणुकीमुळे संताप व्यक्त होत आहे.