हिंगणा: लाडगाव व गोधनी रीठी येथील नवीन नागपूर प्रकल्प नकोय; भूसंपादनाला विरोध
Hingna, Nagpur | Nov 8, 2025 नवीन नागपूर प्रकल्पाकरिता लाडगाव व गोधनी रिठी येथील जवळपास १७०० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. एनएमआरडीएच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू आहे. सद्यःस्थितीत बाजारभावानुसार जमिनीचे दर एकरी ५५ लाख रुपये आहे. त्यानुसार पाचपट मोबदला देण्यात यावा, एकरी दोन हजार स्क्वेअर फुटांचा भूखंड देण्यात यावा, अशी मागणी ग्रामसभेला उपस्थित शेतकऱ्यांनी केली.शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या आक्षेपांचा शासनाने फेरविचार करावा. योग्य मोबदला दिल्याशिवाय या प्रकल्पाकरिता जमीन देणार नाही,