धुळे: गोंदूरमध्ये अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, माजी आमदार कुणाल पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; जास्तीतजास्त भरपाईचे आश्वासन
Dhule, Dhule | Sep 28, 2025 धुळे तालुक्यातील मुसळधार पावसामुळे खरिपाची पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार कुणाल पाटील गोंदूर शिवारात पोहोचले. त्यांनी गुडघाभर पाण्यात उतरून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला. पाटील यांनी ही माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सांगत जास्तीतजास्त भरपाई व पिकविमा कंपन्यांकडून २५ टक्के अग्रिम रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन दिलं.