वेंगुर्ला: पाल-सडा भागात गव्या रेड्यांचा धुमाकूळ : शेती, बागायतीचे नुकसान
वेंगुर्ले तालुक्यातील पाल, सडा भागात गवा रेड्यांचा कळप आज दाखल झाला. येथील सडा भागातील शेतकर्यांच्या शेतीचे त्यांनी नुकसान केले. या गवा रेडयांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकर्यांमधून होत आहे.