हिंगणघाट: आमदार समिरभाऊ कुणावार यांनी जीवरक्षक फाउंडेशनला अपघातग्रस्त जनावरांच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिली क्रेन
हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्ग व अन्य रस्त्यांवर गोवंश वाहनांसमोर येत असल्यामुळे वारंवार अपघात घडत होते. यामध्ये जनावरांसोबतच नागरिकांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण होत होता याची दखल घेऊन आमदार समिरभाऊ कुणावार यांनी जीवरक्षक फाउंडेशनला जनावरांच्या उपचारासाठी २७ हजार रुपये किमतीची क्रेन उपलब्ध करून दिल्याची माहिती जीवरक्षक फाउंडेशन’चे राकेश झाडे यांनी दिली. शहरातअपघातग्रस्त जनावरांना तातडीने हलवून प्राथमिक उपचार मिळावेत या हेतूने क्रेन उपलब्ध करून दिली आहे.