सातारा: नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने 2 डिसेंबर रोजी सुट्टी
Satara, Satara | Nov 29, 2025 कराड, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा, वाई, मलकारपूर व मेढा या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये , निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका मंडळे, महामंडळे इत्यादींना लागू राहील. तसेच उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील.