संगमनेर: संगमनेर मतदारसंघात साडे नऊ हजार बोगस मतदार! बाळासाहेब थोरातांचा आरोप..!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील अनुभवी राजकारणी बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या संगमनेर मतदारसंघात तब्बल 9,500 बोगस मतदारांची नोंद झाल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक मतदारांची नावे दुबार नोंदवली गेली आहेत, तर काहींची नावे इतर मतदारसंघातील असूनही संगमनेरच्या यादीत दिसत आहेत. निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाकडून ही बनवाबनवी केली जात आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय. संगमनेर मतदारसंघात आम्ही साडेनऊ हजार दोष दाखवून दि