तळा: तहसील कार्यालय तळा येथे संच मान्यता धोरणाच्या विरोधात प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
Tala, Raigad | Mar 30, 2024 तळा शहरातील तहसील कार्यालय तळा येथे शनिवार दि.३० मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान प्राथमिक शिक्षक समितीतर्फे तहसीलदार स्वाती पाटील यांना संच मान्यता धोरणाच्या विरोधात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय येलवे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमिष भौड,तालुका अध्यक्ष सुनिल बैकर यांसह शिक्षक समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.