जावळी: प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत महू धरणातील पाणी लाभक्षेत्रापर्यंत जाऊ न देण्याचा इशारा
Jaoli, Satara | Aug 29, 2025 जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत महू धरणातील पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊ दिले जाणार नाही. वसंतराव मानकुमरे हे जलसमाधी घेण्याची भाषा करत आहेत, मात्र त्याला आमचा ठाम विरोध असून त्यांना महू धरणावर मानकुमरे यांना फिरकू देणार नाही, असा थेट इशारा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता सर्व प्रकल्पग्रस्त गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन धरण कार्यस्थळावर मानकुमरे यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेचा खरपूस भाषेत समाचार घेतला.