पाथ्री: बस स्थानक जवळील एटीएम फोडण्याचा प्रयत्न, एटीएमला लागली आग
पाथरी शहरातील बस स्थानक जवळील सेलू कॉर्नर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या एटीएमला गॅस कटरच्या साह्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न २४ ऑक्टोबरला पहाटे चारच्या सुमारास झाला. या घटनेत एटीएम मधील दोन एसी जळून खाक झाल्या आहेत.