धरणगाव: चिंचोली येथे तलावात मासे पकडताना पाय घसरून तरुणाचा बुडून मृत्यू; रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे वाकी नदीजवळ असलेल्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता घडली. पिंटू बुधा पवार (वय 28, रा. चिंचोली) असे मयत तरुणाचे नाव आहे.