आर्वी: कर्जाच्या चिंतेपाई घरी कोणीही नसल्याचे पाहून शेतकऱ्यांन गटकले घरीच विष.. धनोडी बहादरपूर येथील घटना..
Arvi, Wardha | Nov 2, 2025 शेतात काहीच पीक झाले नाही आपण घेतलेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत असलेल्या शेतकऱ्याने 31 तारखेला रात्री दहा वाजताच्या दरम्यान घरी ठेवलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना धनोडी बहादरपूर येथे उघडकीस आली त्यामुळे परिसरात एकच खडबड उडाली आहे वासुदेवराव नानाजी मुळे वय साठ वर्ष राहणार धनोडी बाहादरपुर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे..आर्वी पोलिसांनी या संदर्भात एक तारखेला एक वाजून 40 मिनिटांनी या घटनेची नोंद करून तपास सुरू असल्याची माहिती आज दिली..