पाथर्डी: पिस्तूलचा धाक दाखवत सुमारे ३ लाख रोकड व सोन्याचे दागिने लुटले.. खांडगाव शिवारातील घटना...
देवदर्शनासाठी नाशिकहून आलेल्या खैरनार कुटुंबाच्या मिनी ट्रॅव्हल्सवर पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तुल व लोखंडी रॉडच्या धाकावर हल्ला करून सुमारे दोन लाख ९६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लुटल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता पाथर्डी तालुक्यातील खांडगाव शिवारात घडली. फिर्यादी पवन सुखदेव खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, देवदर्शनावरून परत जात असताना पांढरी स्विफ्ट कार त्यांच्या गाडीसमोर आडवी लावून चोरट्यांनी चालकास मारहाण केली.