हिंगणघाट: रहस्यमयरीत्या बेपत्ता मुलगी अवघ्या काही तासाच सिकंदराबादहून सुखरूप ताब्यात:शहर पोलिसांची शानदार कामगिरी
हिंगणघाट शहरातील शिकवणी वर्गाला गेलेली अल्पवयीन मुलगी गुरुवारी सायंकाळी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने पालक व परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांच्या तात्काळ तत्परतेने अवघ्या काही तासांतच मुलीचा शोध लावण्यात यश आले असून ती हैदराबाद येथील सिकंदराबाद परिसरातून सुखरूप सापडली आहे अशी माहिती ठाणेदार अनिल राऊत यांनी दिली आहे. या वेगवान आणि अचूक कारवाईबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे, मुलगी सुखरूप सापडल्याने तिच्या पालकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.