आज दिनांक 19 मे 2025 वेळ दुपारी तीन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुंबईतील विधान भवन परिसर प्रवेशद्वार जवळील सुरक्षा केबिनमध्ये आगीची घटना घडली आहे घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याचा आता तपास केला जात असून आग अग्निशमन दलाने पूर्ण नियंत्रणात आणली आहे.