नाशिक आदर्श नगर, रामवाडी येथे रात्री चालक मुन्सी अब्दुल शेख (वय 57) यांच्यावर दोन इसमांनी मारहाण केल्याची घटना घडली. रूपेश मंगेश जाधव आणि त्याच्या सोबतीने फिर्यादीस शिवीगाळ करत काचेची बाटली व लाकडी दांड्याने गंभीर मारहाण केली. "परत आला तर मारून टाकू" अशी धमकीही दिली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात कलम गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहवा डी.बी. शेळके करीत आहेत.