चंद्रपूर: शेतातील कुंपणाने केला घात; शेतकऱ्याचा मृत्यू, आंबेझरी येथील घटना
आंबेझरी येथील एका शेतकऱ्याचा शेताच्या कंपाउंड तारेचा करंट लागल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. झाडू कन्नू आत्राम (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.