वर्धा: वर्ध्यात 'धम्मध्वज यात्रा' दाखल: बोधगया महाविहाराच्या मुक्तीची मागणी
Wardha, Wardha | Sep 17, 2025 नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीतून १६ सप्टेंबर रोजी सुरू झालेली 'धम्मध्वज यात्रा' आज १७ सप्टेंबर रोजी वर्ध्यात दाखल झाली. ही यात्रा बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे सायंकाळी सात वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे