मोहाडी: रोहना येथे जेसीबीच्या सहाय्याने ७ एकर शेतीचे नुकसान, आरोपीविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील रोहना येथे फिर्यादी शेतकरी गीता सुखदेव भुरे यांची शेती असून त्यांनी आपल्या शेतात गहू, चना व तुरीचे पीक लावले असता यातील आरोपी अमित हेडा रा. भंडारा यांनी फिर्यादीच्या गट क्रमांक 924 शेतीमध्ये प्रवेश करून अनाधिकृतपणे शेतातील लागवड केलेल्या पिकांचे नुकसान केले. यावेळी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी अमित हेडा व जेसीबी चालक दीपक सोनेवाने यांच्याविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.