सातारा: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात विविध संघटनांकडून शाहू चौक येथे अभिवादन
Satara, Satara | Nov 28, 2025 महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज साताऱ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संघटनांकडून त्यांना अभिवादन करण्यात आले. सकाळपासूनच नागरिक आणि समाजकार्यकर्त्यांनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करून समाजातील शोषित, वंचित आणि सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेल्या लढ्याची आठवण उपस्थितांनी ताजीतवानी केली.