नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील खुमारी परिसरात शनिवार दिनांक 10 जानेवारीच्या पहाटे साडेसहा वाजता च्या दरम्यान कंटेनर चालकाला डुलकी आल्याने कंटेनर पलटल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही इजा अथवा हानी झालेली नाही. मात्र कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.माहितीप्रमाणे या अपघातात कंटेनर क्रमांक एनएल 01 ए एफ 68 01 पलटला.