रेणापूर: भाजपा नेते आ रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर...!
Renapur, Latur | Oct 14, 2025 भाजपा नेते आ रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर...! रेणापूर येथे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तीन कोटी रुपये खर्चाचे इंनडोअर स्टेडियम यासह इतर विकास कामासाठी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे सदरील निधी मंजूर झाल्याने रेणापूरच्या विकासात मोठी भर पडणार आहे.