मुळशी: सुस परिसरात माजी न्यायमूर्तीच्या समितीने मनाई केलेल्या २८ कोटींच्या जमिनींची परस्पर विक्री; कुठे घडला हा प्रकार?
Mulshi, Pune | Oct 19, 2025 मुळशी तालुक्यातील सुस परिसरातील २७ कोटी ९१ लाख रुपये किंमतीच्या १३ हेक्टर जमीनीची विक्री करण्यास माजी न्यायमूर्तीच्या समितीने मनाई केली असतानाही जमिनीची परस्पर विक्री करत फसवणूक केली.याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.