भोकरदन: पारध धामणगाव बस त्वरित सुरू करावी पारध येथे विद्यार्थ्यांची बुलढाणा आगाराकडे मागणी
आज दिनांक नऊ नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन तालुक्यातील पारद येथे शेकडो विद्यार्थ्यांनी वगळी सामाजिक कार्यकर्त्यांनी बुलढाणा आगार प्रमुख यांच्याकडे मागणी केली आहे की पारध धामणगाव ही बस मागील काही दिवसापासून बंद होती कारण या रस्त्याची दुरवस्था झाली होती मात्र आता रस्ता सुरळीत झाला असून बस त्वरित सुरू करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना व आबाल वृद्धांना रहदारी करण्यासाठी सुरळीत होईल अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देशमुख यांनी केली आहे.