धुळे: पोलीस मुख्यालयात शौर्याला सलाम! जिल्हा मुख्य न्यायाधीश आणि पोलीस अधीक्षकांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Dhule, Dhule | Oct 21, 2025 पोलीस स्मृतिदिनानिमित्त धुळे येथील पोलीस मुख्यालयात शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी प्राणार्पण केलेल्या शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून शहीदांना मानवंदना दिली.