नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर हर्ष पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने कृषी जलसंधारण या क्षेत्रामध्ये मार्वल कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रयोग केले होते. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी कोणाजवळ शस्त्र आहेत का किंवा कोणी हरवलेल्या व्यक्ती या गर्दीमध्ये आहेत का याचा शोध कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे घेतला जातो.