भंडारा: भंडाऱ्यात पालिकेचा 'बुलडोजर' सुसाट; सलग दुसऱ्या दिवशीही मुख्य मार्गावरील अतिक्रमणांचा सफाया!
भंडारा शहरातील वाढती वाहतूककोंडी आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, भंडारा नगरपरिषद प्रशासनाने मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या नेतृत्वाखाली शहरात पुन्हा एकदा धडाकेबाज अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे. मागील १५ दिवसांपूर्वी ३ जानेवारीला खात रोड आणि खाम तलाव परिसरात झालेल्या कारवाईनंतर, आता पुन्हा १९ जानेवारीपासून शहरातील मुख्य मार्गांवर जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेत रस्ते, फुटपाथ आणि नाल्यांवर थाटलेल्या अवैध टपऱ्या...