हिंगोली: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन
हिंगोली दिवाळीनिमित्त प्रकाशित झालेल्या विविध दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी करण्यात आले.यावेळी जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आदींची उपस्थिती होती.