मोडगाव येथे दुचाकीची नंबर प्लेट का तोडली असे विचारल्याचा राग आल्याने दोघांनी हाताबुक्यांनी बेदम मारहाण करून एकाला जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे., मदन सरदार नाईक रा.लेघापाणी ता.धडगाव यांची दुचाकी क्र.एमएच 15 डीझेड 3371 हिची नंबर प्लेट सुनिल रमेश वळवी याने तोडली. याची विचारणा केली असता याचा राग आल्याने मदन नाईक यांना सुनिल रमेश वळवी व सुर्या रोडवा मोरे दोन्ही रा.लेघापाणी ता.धडगाव यांनी मारहाण केली आहे.