धरणगाव शहरातील नेहरू नगरात असलेल्या ईलेक्ट्रीक दुकानातून ४० हजार रूपये किंमतीचे ईलेक्ट्रीक साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.