दि.15 जानेवारी 2026 रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरीता राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी व सहा.निवडणूक अधिकारी यांचेकरीता महापालिका मुख्यालयात विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूका निष्पक्ष व बिनचूक पार पडण्याकरीता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आचारसंहिता पथक प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, निवडणूक विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.