लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती, ता. हवेली) येथील सेंट टेरेसा स्कूलजवळ एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी (ता.20) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.मधुकर विठ्ठल गिरिगोसावी (वय 69, रा. राममंदिराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.