नंदुरबार: शिक्षण विभागाचा बोगस कारभार, अनुकंप धारकाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिवारासह आमरण उपोषण
नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आला आहे. शहादा तालुक्यातील असलोद गावातील एका शैक्षणिक संस्थेने पद नसतानाही अनुकंपा धारक सागर इंगळे यांची नियुक्ती केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर वारंवार निवेदन देऊनही न्याय मिळत नसल्याने अखेर आज अनुकंप धारकाने परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.