साकोली: नागझिरा रोडवरील गोपाळ वस्ती व आमराई वस्तीमधील बालकांसोबत व्हीआयपी ग्रुप, साकोली मीडिया व फ्रिडमनी साजरी केली दिवाळी
साकोली येथील नागझिरा रोडवरील गोपाळवस्ती व आमराई वस्ती मधील लहान बालकांसोबत व्हीआयपी ग्रुप,साकोली मीडिया आणि फ्रीडम युथ ऊंडेशन यांच्या वतीने दिवाळीचा सण गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता साजरा केला अत्यावश्यक वस्तू नवीन कपडे मिठाई आणि फटाक्यांची आतिशबाजी करत या बालकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी बालगोपालांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता