महाड: प्रशासनाने योग्य दखल घेऊन कठोर कारवाई करावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
Mahad, Raigad | Dec 2, 2025 निवडणुका शांततेत पार पाडणे, हे सर्वच राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सदैव लोकशाही व संविधानिक मूल्यांना अग्रस्थानी मानूनच, आपली राजकीय आणि सामाजिक वाटचाल केली आहे. लोकशाहीत अशाप्रकारच्या हिंसाचाराला कुठलेही स्थान नसून, देशाच्या लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणाऱ्यांची निवडणूक आयोग व प्रशासनाने योग्य दखल घेऊन कठोर कारवाई करावी. अशी प्रतिक्रिया आज मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिली.