चिखली: चिखली अमडापुर रस्त्यावर भर दिवाळीच्या दिवशी पायी चालणाऱ्या इसमास भरधाव टिप्पणी उडवले, देहाच्या झाल्या चिंधड्या चिंधड्या
दिवाळीच्या उत्साहात सारा जिल्हा आनंदात असताना, अमडापूर-चिखली मार्गावर आज संध्याकाळच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. रेतीने भरलेल्या एका टिप्परने रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीस अक्षरशः चेंदून टाकले. अपघात इतका भयंकर होता की मृत व्यक्तीचे शरीर पूर्णतः विद्रूप झाले असून, बॉडीचा अक्षरशः चंदामेंदा झाला आहे. घटनास्थळ पाहून नागरिकांच्या अंगावर काटा आला आहे.