पेठ: काळूणे येथील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नाम फाऊंडेशनने दिला मदतीचा हात
Peint, Nashik | Nov 2, 2025 पेठ तालुक्यातील काळूणे येथे अतिवृष्टीने मोठया प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते गिरीश गावीत , मनोज सहाळे यांच्या माध्यमातून नाम फाऊंडेशन च्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. अतिकष्टी व बादळाने संसार उध्वस्त झाल्याने रस्त्यावर आलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला.