तुळजापूर: मंगरूळमध्ये जुन्या वादातून तरुणावर हल्ला; तुळजापूर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २५ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी वैभव विजय बचाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती तुळजापूर पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी दोन वाजता दिली.