पुरंदर: शिखर शिंगणापूर यात्रेसाठी तेल्या भुत्याच्या कावडीचे खळद येथून रात्री प्रस्थान
Purandhar, Pune | Apr 18, 2024 श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे सुरू असलेल्या वार्षिक यात्रेसाठी पुरंदर तालुक्यातील खळद, एखतपूर, मुंजवडी,खानवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीच्या मानाच्या श्री संत तेल्या भुत्याच्या कावडीचे खळद येथून शाही मिरवणुकीने प्रस्थान झाले. मानकरी नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान सोहळा झाला. यावेळी कावडीसोबत जवळपास ७५ बैलगाड्या, ट्रॅक्टर, टॅंकरचा ताफा तर हजारो भाविक चालत या यात्रेसाठी रवाना झाले